‘अश्रूंची झाली फुले’ हा नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जवळपास अडीच वर्षं आपण ह्या आनंदापासून वंचित असल्या कारणाने ही गेल्या रविवारची आनंदयात्रा थोडी विशेषच वाटते आहे. कलाकारांविषयी सांगायचं तर त्यांना आपला वॉशिंग्टन डीसी चा प्रयोग आणि आपला पाहुणचार मनापासून पसंत पडला आहे.
प्रयोगानंतर आम्हाला कलाविष्कारच्या सदस्यांना आपल्या पैकी अनेकांनी कार्यक्रम आणि कार्यक्रमाचे संयोजन उत्तम झाल्याची पोचपावती दिली त्यामुळे आमचाही उत्साह द्विगुणित झाला आहे. आम्ही असेच अनेक सुंदर सुंदर कार्यक्रम आपल्यासमोर सादर करण्यासाठी ह्यापुढेही कटिबद्ध राहू.
मंडळी, गेल्या दीड-अडीच वर्षात नानाविविध कल्पनांवर विचार विनिमय झाला. काही योजना आखण्यात आल्या पण करोनाच्या विघ्नामुळे त्या तेव्हा अंमलात आणणे शक्य झाले नाही. पण कलाविष्कार कुटुंबाला आणि आपल्याला रसिक प्रेक्षकांना “आव्हानं” नवी नाहीत. कलाविष्कार कुटुंब आपल्या रसिक प्रेक्षकांचा बिनशर्त पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे आजवर अशा अनेक संकटांचा सामना करून अनेक प्रकल्प तडीस नेत आलेलं आहे. सध्या अशाच एका उत्तुंग प्रकल्पाची जय्यत तयारी चालू आहे. त्याबद्दलची घोषणा आम्ही लवकरच करू : )
Stay Tuned!!
कलाविष्कार-डीसी.
info@wordpress-912347-3167373.cloudwaysapps.com