Kalavishkar Proudly Presents

in collaboration with

मराठी कला मंडळ of Greater Washington DC

अश्रूंची झाली फुले

एक हृदयस्पर्शी नाटक

प्रभाकर पणशीकर आणि काशिनाथ घाणेकर या दोन दिग्गजानी साठ वर्षांपूर्वी गाजवलेली ‘अश्रूंची झाली फुले’ ही असामान्य कलाकृती आजही अनेकांना भुरळ घालते. या नाटकाने एक इतिहास रचला असून त्याच्या आठवणींनी आणि अनुभवाने दोन पिढ्यांवर गारुड केले आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ ह्या सिनेमामुळ्ये आज तरुणाईतही ह्या नाटकाविषयी प्रचंड कुतूहल आहे. आणि ह्याच आग्रहाखातर, रंगभूमीवर पुन्हा एकदा आलाय लेखक वसंत कानेटकरांचा ‘लाल्याऽऽऽऽ’! अर्थातच आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता सुबोध भावे!!

‘अश्रूंची झाली फुले’ हे शैलेश दातार, उमेश जगताप, सीमा देशमुख आणि सुबोध भावे ह्यांच्या अभिनयाने सजलेलं नाटक आपण व्हर्जिनिया-डीसी-मेरीलँड भागातील रसिकांसाठी आयोजित करत आहोत. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, येताय ना? नाट्यगृहाची आणि तिकीट बुकिंग ची माहिती  लवकरच जाहीर करू. २ वर्षांनी आपल्या आप्तेष्टांसोबत नाट्यगृहात नाटक बघूया आणि एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा देऊया. ह्या पाडव्याची तसंच नवीन वर्षाची सुरवात होणारे.. “एकदम… कॅडऽऽक”!!

ह्या कार्यक्रमाचे आयोजन करताना तेव्हाच्या सर्व कोविड-१९ नियमांचे पालन केले जाईल ह्याची खात्री बाळगावी.

 

रविवार, ३ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजता.

George Marshall Highschool

7731 Leesburg Pike, Falls Church, VA 22043

 

Tickets: $75 (Platinum), $50 (Gold), $35 (Silver)

Bookings will open on Sunday, February 27th

Questions? Send email to: info@wordpress-912347-3167373.cloudwaysapps.com